Sanjay Raut : “….त्यांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल झाली…”; आव्हाड पडळकर कार्यकर्त्यांच्या मारहाणीवरून राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

Sanjay Raut : विधनाभवनाच्या लॅाबीत आव्हाड पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीच्या घटनेनंतर याचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटल्याचे पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितेश देशमुख यांना गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले यांनी मारहाण केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, आज विधिमंडळाच्या शेवटच्या दिवसाअगोदर घडलेल्या या घटनेमुळे गालबोल लागल्याचे बोलले जात आहे. आता या घटनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या विधानभवनात गँगवॉर झाले. भारतीय जनता पक्षाने विधीमंडळात आणि त्यांच्या पक्षात गुंड टोळ्या आणल्या आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र राज्याची संस्कृती उध्वस्त झाली आहे, त्यांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल झाली, अशा शब्दांत राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरंच कुठे नेऊन ठेवलाय शिवरायांचा महाराष्ट्र? असा सवालही त्यांनी केला आहे.
मोदी शहांवर निशाणा
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत या घटनेवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला आहे. आज ज्याने विधानभवनात दंगल केली ते आमदार पडळकर टीम देवेंद्रचे सदस्य आहेत मोदी शहा यांनी महाराष्ट्रात हे काय पेरले आहे? अत्यंत वेदनादायी असे हे चित्र आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या विधानभवनात आज गँग वॉर झाले.
भारतीय जनता पक्षाने विधीमंडळात आणि त्यांच्या पक्षात गुंड टोळ्या आणल्या आहेत,
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र राज्याची संस्कृती उध्वस्त झाली आहे,
फडणवीस हे गृहमंत्री आहेत,
त्यांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल झाली!
आज ज्याने… pic.twitter.com/2r2iuQypTQ— Sanjay Raut (@rautsanjay61) July 17, 2025
नेमकं प्रकरण काय ?
गुरूवारी १७ जुलै या दिवशी विधानभवनाच्या लॅाबीत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. या घटनेवरून विरोधकांकडून भाजप आणि पडळकर यांच्यावर कडक शब्दांत हल्लाबोल करण्यात येत आहे.
हेही वाचा : दिल्लीतील शाळांना पुन्हा बॉम्बची धमकी ; अग्निशमन विभाग अन् पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल





