चाळीत लागलेल्या आगीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू; ३ जण गंभीर जखमी
Updated On:

मुंबई – दक्षिण मुंबईतील कफ परेड येथील चाळीत सोमवारी पहाटे आग लागल्याने १५ वर्षीय यश विठ्ठल खोत या मुलाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील शिवशक्ती नगर येथील एका मजली चाळीत (रो सदनिका) पहाटे ४.१५ वाजता ही घटना घडली.
आगीत जखमी झालेल्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. देवेंद्र चौधरी (३०), विराज खोत (१३) आणि संग्राम कुरणे (२५) या जखमींवर उपचार सुरू आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे १०x१० फूट परिसरात आग केवळ इलेक्ट्रिक वायरिंग, इन्स्टॉलेशन्स, तीन इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी आणि घरगुती वस्तूंमध्येच मर्यादित होती. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.





