विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Updated On:

मुंबई- विधासभेचे विरोधी पक्ष नेते ‘राधाकृष्ण विखे पाटील’ हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची चित्रे दिसून येत आहेत. याच पार्श्ववभूमीवर विखे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस’ यांची वर्षा निवास्थानी जाऊन आज भेट घेतली आहे. त्यामुळे आता, विखे पाटील यांचा भाजप प्रवेश कधी होणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
दरम्यान, विखे पाटील हे आपल्या बरोबर काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकांसह पावसाळी अधिवेशन सुरु होण्याअगोदरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.





