Gokul Election : गोकुळमध्ये चेअरमन निवडीत मोठा ट्विस्ट! १३ जागा जिंकूनही सतेज पाटलांची डोकेदुखी वाढली कारण…
Gokul Election : गोकुळ दूध संघात समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या असल्या, तरी चेअरमनपदाच्या निवडीसाठी आवश्यक असलेल्या कोरमचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने बाजी मारत मोठे यश मिळवले. २५ पैकी १३ सदस्य निवडून आणत त्यांच्या गटाने बहुमताचा आकडा गाठला.
या निकालाची राज्यभर चर्चा सुरू असतानाच आता गोकुळच्या चेअरमनपदाच्या निवडीवरून नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. विजय मिळूनही सतेज पाटील यांच्या गटासमोर अध्यक्ष निवडीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
बहुमत असूनही चेअरमन निवडीत अडचण?
गोकुळ दूध संघात समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या असल्या, तरी चेअरमनपदाच्या निवडीसाठी आवश्यक असलेल्या कोरमचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.
अध्यक्षपदाची निवडणूक आणि सभेचे कामकाज पार पाडण्यासाठी १४ सदस्यांचा कोरम आवश्यक आहे. त्यामुळे बहुमत मिळवूनही सत्ताधारी गटाची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुतीच्या एका निर्णयाने गणित बदलणार?
या परिस्थितीत महायुतीची भूमिका निर्णायक ठरू शकते. महायुतीने आपल्या सदस्यांना चेअरमन निवडीच्या वेळी तटस्थ राहण्यास सांगितले किंवा सभेला अनुपस्थित ठेवले, तर कोरम पूर्ण होण्याबाबत अडचण निर्माण होऊ शकते. परिणामी, अध्यक्ष निवडीची प्रक्रिया रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या गटाने मिळवलेले यश आता चेअरमनपदाच्या निवडीच्या टप्प्यावर कसोटीला लागणार आहे. एका बाजूला बहुमताचे संख्याबळ, तर दुसऱ्या बाजूला कोरमचा तांत्रिक पेच, अशी द्विधा स्थिती निर्माण झाली आहे.
आता महायुती कोणती रणनीती आखते आणि सतेज पाटील यांचा गट या परिस्थितीतून कसा मार्ग काढतो, यावर गोकुळच्या पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असतील. त्यामुळे चेअरमनपदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
Graduate Constituency Voting: पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान; संपूर्ण यंत्रणा सज्ज





