Shivnagar Shikshan Sanstha : शिवनगर शिक्षण संस्थेत पवार परिवाराची नवी दिशा; सुनेत्रा पवार उपाध्यक्ष, पार्थ व युगेंद्र मानद सदस्य
Shivnagar Shikshan Sanstha : शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

माळेगाव – माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील प्रतिष्ठित शिवनगर विद्या प्रसारक मंडळात पवार परिवाराची नवी वर्णी लागली असून संस्थेच्या शैक्षणिक आणि विकासात्मक वाटचालीला नवसंजीवनी मिळाली आहे.
संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी उपाध्यक्षपदाची धुरा स्वीकारली, तर पार्थ अजित पवार आणि युगेंद्र श्रीनिवास पवार यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असलेली ही संस्था परिसरातील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असून, तिच्या पोटनियमानुसार कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याची तरतूद आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारत संस्थेच्या कार्याला नवी दिशा दिली. (Shivnagar Shikshan Sanstha)

Shivnagar Shikshan Sanstha : शिवनगर शिक्षण संस्थेत पवार परिवाराची नवी दिशा; सुनेत्रा पवार उपाध्यक्ष, पार्थ व युगेंद्र मानद सदस्य
या निर्णयामुळे संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बैठकीस ॲड. राजेंद्र काटे, धन्यकुमार जगताप, विराज खलाटे, प्रवीण पोंदकुळे, डॉ. मोहन नेवसे, रोहन देवकाते, सचिव डॉ. धनंजय ठोंबरे तसेच निमंत्रित सदस्य गणपतराव देवकाते व अशाताई जराड उपस्थित होते.
बैठकीत बोलताना अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, पार्थ पवार आणि युगेंद्र पवार यांच्या सहभागामुळे संस्थेच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अधिक प्रभावी उपक्रम राबविण्यास चालना मिळेल. उपस्थितांनी या निर्णयाचे स्वागत करत संस्थेच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा :





