Pune District : गाव विकासासाठी समविचारी सरकार हवे : माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

पारगाव शिंगवे : देशात व राज्यात आपल्याच विचाराचे सरकार असून गावच्या विकास कामासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव, शिंगवे, लाखणगाव,पोंदेवाडी,देवगाव, वाळुंजनगर आदी गावात गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पारगाव येथे झालेल्या कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,अरुण गिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव ढोबळे,शरद बँकेचे संचालक दौलतराव लोखंडे, माऊली अस्वारे, बाजार समितीचे सभापती निलेश थोरात ,उपसभापती सचिन पानसरे, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष वैभव उंडे, भगवान वाघ, रवींद्र करंजखिले, माजी सरपंच अनिल वाळुंज, शैलेजा ढोबळे, बबनराव ढोबळे, विरेंद्र ढोबळे, तसेच सुदाम वाव्हळ, बारकूशेठ जगताप, संतोष वाव्हळ, शुभम चांगण, सतीश रोडे, मनोज ढोबळे, शिरीष कुमार रोडे,काळूराम लोखंडे आदी मान्यवर व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले,





