Samruddhi Expressway Accident | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
Updated On:

जालना : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना जालन्यातील जामवाडी परिसरात घडली आहे. ट्रकला अपघात झाल्याने ट्रकमधील सहा जण खाली उतरले होते. मात्र, मागील बाजूने येणाऱ्या रुग्णवाहिकेने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
हे सर्व जण ट्रकमधून नाशिकला निघाले होते. ट्रकचा अपघात झाल्याने ते कुटुंब कसाबसा जीव वाचवून उतरले होते. मात्र, मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेने धडक दिल्याने 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात काही जण जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य राबविले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





