“मूर्ती नव्हे मुलगी” ! पुण्यात विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं रुप

Pune Ganpati Visarjan 2025। पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे. दरम्यान, पुण्यात मानाच्या पाचही गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. दरम्यान , या विसर्जन मिरवणुकीत पुण्यात चक्क कोल्हापूरची महालक्ष्मी अवतरली आहे.
पुण्याच्या मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरीच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे रूप आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. तांबडी जोगेश्वरीच्या विसराजन मिरवणुकीत शिवमुद्रा ढोल पथकांचे वादन तर होणारच आहे सोबत कोल्हापूरची महालक्ष्मीचे हुबेहूब दिसणारी जिवंत कलाकृती त्यांनी साकारली आहे.
महालक्ष्मीच्या रूपात पथकातील कृतिका फणसेकर गावखेडकर या मुलीने साकारले आहे. त्यामुळे सध्या हे तिचे रूप पाहण्यासाठी पुणेकर गर्दी करताना दिसत आहेत. यासह संबळ आणि इतर वाद्यांचे वादन देखील करण्यात येणार असल्याचे शिवमुद्रा पथकाकडून सांगण्यात आले आहे.





