Keshav Upadhyay’s post : पावसाने महाराष्ट्रात कहर केला असून मराठवाड्याला पावसाचा जबर फटका बसला आहे. धुव्वादार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. पूराच्या पाण्यात गावच्या गावं वेढली गेलेली आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत आहे. पावसामुळे शेती जमीनदोस्त झाली आहे.पूराच्या पाण्यात संस्कार वाहून गेले आहेत. सध्या अत्यंत भीषण परिस्थितीचा सामाना पूरग्रस्त भागातील नागरिक करताना दिसत आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. तिथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले. उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पूरग्रस्त भागांचा दौरा करत शेतकऱ्यांना धीर देत नुकसानीची पाहणी केली. उद्धव ठाकरे यांनी पीएम केअरमध्ये हजारो कोटी रुपये पडून असून हा पैसा शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी केली होती. या मागणीवर भाजपच्या प्रवक्त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्ताना द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्ताना द्यावा ! मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयंकर आहे. लोकांच सगळं उध्वस्त झालं आहे. त्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यात तब्बल तीन तासांचा दौरा करून दुःख, वेदना, व्यथा व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावना पाहून सगळेच… — Keshav Upadhye (@keshavupadhye) September 29, 2025 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या दसरा मेळाव्यात विचांराचे सोने लुटले जायचे, आता तिथे येऊन मिंधे, गद्दार, माझा पक्ष चोरला एवढीच टेप वाजवणार असा घणाघात भाजपच्या प्रवक्त्यांनी एक्सवरून पोस्ट शेअर करत केला आहे. नुसताच थयथयाट अन् कांगावा… त्यासाठी बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा? ते रडगाणं तर सामनातून चालूच असतं की असा खोचक टोलाही लगावला आहे. मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयंकर आहे. लोकांच सगळं उध्वस्त झालं आहे. त्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यात तब्बल तीन तासांचा दौरा करून दुःख, वेदना, व्यथा व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावना पाहून सगळेच अस्वस्थ झाले आहेत. उद्धवराव, आता वेळ आहे कृती करायची… मुख्यमंत्री असताना तर कधी कृती न करता घरात बसून राहिलात, आता त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे, असंही पोस्टमध्ये म्हटले आहे. हेही वाचा : ‘आई कुठे काय करते फेम’ अभिनेत्रीच्या कारचा अपघात; रुपाली भोसलेने वर्षाच्या सुरुवातीलाच घेतली होती महागडी कार