‘आई कुठे काय करते फेम’ अभिनेत्रीच्या कारचा अपघात; रुपाली भोसलेने वर्षाच्या सुरुवातीलाच घेतली होती महागडी कार

Rupali Bhosale car accident : वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना दखल घ्यायला लावणारी छोट्या पडद्यावर अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या इंन्स्टाग्रावर शेअर केलेल्या एका स्टोरीमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रुपालीला स्टार प्रवाह या वाहिनीवरील अत्यंत गाजलेल्या आई कुठे काय करते या मालिकेद्वारे प्रसिद्ध मिळाली. तिने साकारलेले नकारात्मक संजना हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले.
अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. रुपालीने हिने या वर्षाच्या सुरुवातीलाच मर्सिडीज या कंपनीची एक महागडी कार खरेदी केली होती. याच गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातामुळे गाडीचे नुकसान झाले आहे. रुपालीने तिच्या इंन्स्टा स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत अपघाताची माहिती दिली आहे. अपघातात गाडीच्या बोनटचं नुकसान झाल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे.
रुपालीने हा व्हिडीओ शेअर करीत ‘अपघात झाला, वाईट दिवस’ अशा मोजक्या शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच तिने ब्रेक झालेला हार्ट इमोजी देखील व्हिडीओला वापरला आहे. या धक्कादायक घटनेमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला असून ते चिंतेत आहेत. मात्र, अपघात नेमका कसा झाला नेमकं घडलं तरी काय होतं याविषयी अभिनेत्रीने सविस्तर कोणतीच माहिती दिलेली नाही.






