शाहरुख खानच्या चित्रपटात दिसणार सुप्रसिद्ध अभिनेता; साकारणार खलनायकाची भूमिका

Shah Rukh Khan And Abhishek Bachchan| बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या आगामी चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन दिसणार आहे. अभिषेक बच्चन ‘किंग’चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
एक्सवर एका चाहत्याने अभिषेक बच्चनचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती. “त्यांना माहीत आहे की, खलनायकाची भूमिका ते किती उत्तम प्रकारे निभावतात. त्यांच्या अभिनयावर कधीही शंका घेऊ नका.” असे या पोस्टमध्ये लिहिले होते. आता या पोस्टला टॅग करीत बिग बींनी “हीच ती वेळ आहे. खूप शुभेच्छा!” असे म्हणत अभिषेक बच्चनला शुभेच्छा दिल्या आहेत.
सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात किंग खान म्हणजेच शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिषेक बच्चन हा खलनायकाच्या भूमिकेत आपल्या अभिनयाची झलक दाखविणार आहे. इतकेच नाही, तर शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान ही देखील या चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखविणर आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे निर्माते आहेत. Shah Rukh Khan And Abhishek Bachchan|
all the best Abhishek .. It is TIME !!! https://t.co/LI6F7gZ1b0
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 16, 2024
शाहरुख खान, अभिषेक बच्चन आणि सुहाना खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सध्या सुरू आहे. त्याचे शूटिंग लवकरच सुरू होऊ शकते. निर्माते 2025 मध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, अभिषेक बच्चन यांच्या चाहत्याने टाकलेली पोस्ट अमिताभ बच्चन यांनी टॅग करत शेअर केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आता अभिषेक बच्चन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांवर अमिताभ बच्चन यांनी शिक्कामोर्तब केल्याचे म्हटले जात आहे. Shah Rukh Khan And Abhishek Bachchan|
हेही वाचा:





