मनिला । जगातील एक सर्वात महाग बेटाची चर्चा सध्या सुरू आहे ज्या ठिकाणी एक दिवस थांबायचे भाडे तब्बल 84 लाख रुपये आहे. जगभरातील अनेक पर्यटकांना फिलिपीन्समधील या ठिकाणी भेट द्यायला आवडते. आजूबाजूला असलेले पाणी आणि हिरवळ असल्याने बेटांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.पर्यटकांना बेटांवर रात्रीचा मुक्कामही आवडतो. मात्र, यासाठी भाडे भरावे लागते. या बेटाचे एका दिवसाचे भाडे लाखो रुपये आहे. फिलीपिन्समध्ये असलेल्या या खासगी बेटावर राहणाऱ्या लोकांकडून दररोज लाखो रुपये भाडे आकारले जाते. एवढेच नाही तर या राहण्यासाठी काही अटी देखील आहे.
तीन दिवसांचे भाडे कोट्यवधी रुपयांच्या घरात या बेटावर किमान १५ दिवस राहावे लागते, अशी अट आहे. अशा स्थितीत तीन दिवसांचे भाडे कोट्यवधी रुपयांच्या घरात जाते. 15 एकरांवर पसरलेले हे बेट फिलिपाइन्सच्या पलावान द्वीपसमूहाचा भाग आहे. हे बेट स्वतःच एक रिसॉर्ट आहे. हा जगातील सर्वात महागडा रिसॉर्ट आहे. या बेटावर 6 व्हिला आहेत. व्हिलामध्ये चार बेडरूम असून, प्रत्येक बेडरूममध्ये दोन लोक राहू शकतात. अशा प्रकारे एका व्हिलामध्ये 8 लोक राहू शकतात. अशा परिस्थितीत या बेटावर 48 लोक एकत्र राहू शकतात. हे रिसॉर्ट पुर्णपणे पाण्याने वेढलेले आहे. त्यामुळे सीप्लेन आणि हेलिकॉप्टरनेच येथे पोहोचता येते
एका बेडरूमच्या खोलीत दोन पाहुण्यांचे भाडे प्रतिदिन 2650 डॉलर अर्थात (2.23 लाख रुपये) इतके आहे. ही सुरुवातीची किंमत आहे. या ठिकाणी राहायचे म्हटले तर किमान एक व्हिला बुक करावा लागतो. यासाठी सामान्य हंगामातील एका दिवसाचे भाडे सुमारे 9 लाख रुपये इतके आहे. येथे किमान तीन दिवसाचे बुकिंग करावे लागते. अशा स्थितीत व्हिलाचे तीन दिवसांचे भाडे सुमारे २७ लाख रुपये द्यावे लागते. गर्दीच्या काळात दिवसाचे भाडे तब्बल 84 लाख रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे या बेटावर राहायचे म्हटले तर तीन दिवसांसाठी 2.50 कोटी रुपये खर्च करावे लागतात.
अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत. यामध्ये स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, पोहणे इ. याशिवाय स्टारगेझिंग, टेनिस आणि गोल्फचाही पर्यटक आनंद घेऊ शकतात.राजधानी मनिलाहून प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टरने दीड तासात आणि हाँगकाँगहून तीन तासांत या बेटावर पोहोचता येते. थेट मनिलाहून हेलिकॉप्टर आणि सी प्लेन सुविधाही उपलब्ध आहेत.