पुणे – कात्रज–कोंढवा रोडवरील गगन उन्नती इमारतीसमोरील डायव्हर्शनच्या ठिकाणी आज सकाळी साडेसातच्या सुमारास कंटेनर आणि होंडा स्कूटर यांच्यात अपघात झाला. कंटेनर क्रमांक TG 08 V 3323 च्या मागील चाकाखाली स्कूटर आल्याने हा अपघात घडला. या अपघातात स्कूटरवरून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. तिला तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी भारतीय हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस स्टेशनचा स्टाफ घटनास्थळी दाखल झाला. कंटेनर व चालकाला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. अपघातानंतर रस्त्यावर अडथळा निर्माण झाल्याने कंटेनर बाजूला काढण्यात आला असून सध्या त्या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.