Ajit Pawar : अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यात शोकसभा
Ajit Pawar : ही शोकसभा बुधवार, दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजताबालगंधर्व रंग मंदिर, शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहे.

Ajit Pawar : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. पुण्याच्या खऱ्या अर्थाने पालकत्वाची भूमिका निभावणाऱ्या अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समस्त पुणेकरांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही शोकसभा बुधवार, दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजताबालगंधर्व रंग मंदिर, शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहे. विकासाच्या मुद्यावर कधीही भेदभाव न करणारे, पक्षभेदापलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेणारे नेतृत्व म्हणून अजितदादा पवार ओळखले जात होते. पुण्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि केलेले कार्य कायम स्मरणात राहणार आहे.
या शोकसभेत पुण्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध संस्था, संघटना, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून स्व. अजितदादा पवारांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.





