Pune : दिवाळीच्या पूर्वसंध्येला शिवप्रेमींचा स्तुत्य उपक्रम! सिंहगडावर राबवली स्वच्छता मोहीम
Pune : पुणे दरवाजा ते आतकरवाडी पायथा या मार्गावर गडकिल्ल्यावर साचलेले प्लास्टिक व कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

पुणे : दिवाळी पूर्वसंध्येला बाळकृष्ण वाघचौरे, विजय किरीड, शिरीष रुणवाल, प्रकाश फासे, रामचंद्र कदम, प्रमोद सूर्यवंशी, निलेश सोनार, विनोद शेडगे, कुणाल धावारे, अशोक मरगळे, संतोष इंदलकर, संतोष मोहोळ, दत्ता काशीद, अमोल इंदलकर, संजय मते, सदाशिव एकसंबे, महेंद्र नांदगुडे, महेश मते, श्लोक मते, विनोद मस्के, गणेश जगताप, मनोहर टेमघरे, सागर शिंदे, संजय भगत, हर्षल दारकुंडे या सर्व शिवप्रेमींनी मिळून दुर्ग सिंहगड स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.
पुणे दरवाजा ते आतकरवाडी पायथा या मार्गावर गडकिल्ल्यावर साचलेले प्लास्टिक व कचऱ्याचे संकलन करण्यात आले. यावेळी गडावर येणाऱ्या पर्यटकांना प्लास्टिक मुक्त गडाबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. पर्यटकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचे नियोजन मनोहर टेमघरे, संतोष इंदलकर व अशोक मरगळे हर्षल दारकुंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. मोहिमेची सांगता शिववंदना करून करण्यात आली. दुर्गसंवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देणारी ही मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





