टाटा मोटर्सच्या सर्व गाड्यांचा कार्निव्हल; गाडयांवर देण्यात आल्या अनेक सवलती

पुणे : टाटा मोटर्स पुणे पंडित फार्म येथे प्रथमच पुणेकरांसाठी दिनांक १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्टपर्यंत भव्य श्रावण महोत्सव साजरा करत आहे. यामध्ये ग्राहकांसाठी टाटा कार्सचे भव्य प्रदर्शन करण्यात आले असून ग्राहकांना आपल्या आवडीची कार सहज ऑफरसह कमी किमतीमध्ये विकत घेता यावी याकरता टाटा मोटर्सने प्रत्येक कारवर श्रावण महोत्सवा निम्मित ४ लाखा पर्यंत ऑफर्ससुद्धा दिली आहे.
पुणेकरसुद्धा या महोत्सवाला मोठया प्रमाणात प्रतिसाद देत आहे. महोत्सवाची सुरुवात प्रमुख पाहुणे मनीष सभरवाल महाप्रबंधक (जनरल मॅनेजर, झोनल सेल्स वेस्ट), भूषण चव्हाण (जनरल मॅनेजर, रिजनल सेल्स वेस्ट २), महेश सूर्यवंशी (दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे विश्वस्त), रंजीत तावड़े (डायरेक्टर पीडीसीसी बँक), सुनील चंदारे (व्हाईस चेअरमन पीडीसीसी बँक), सुधाकर पनाले (मेंबर राजश्री शाहू बँक), पद्माकर पवार (मेंबटर राजश्री शाहू बँक), सतीश नाइक (मेंबर राजश्री शाहू बँक), अभय मोहिते (मेंबर राजश्री शाहू बँक) तसेच टाटा मोटर्स डिलर्सचे सर्व कार्यकारी, पदाधीकारीसुद्धा हजर होते.
दीपप्रज्वलन करून आणि रिबीन कट करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. तसेच टाटा मोटर्स श्रावण महोत्सवाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन पुणेकरांना केले. टाटा मोटर्सने ग्राहकांना विविध मोटारीवर विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचा या कार्निव्हलला प्रतिसाद मिळत आहे.





