Jayant Patil : 35 वर्षांची साथ अर्ध्यावर तुटली; अजितदादांच्या जयंतीनिमित्त जयंत पाटील भावुक
Jayant Patil : अजित पवार यांच्या जवळचे असलेले जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Jayant Patil : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राजकीय नेत्यांकडून सोशल मीडियावरुन पोस्ट लिहित त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतरही अजित पवार यांचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचे स्नेहाचे संबंध राहिले आहेत. अजित पवार यांच्या जवळचे असलेले जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
Moshi Accident : मोशीवर पुन्हा कचऱ्याचा भार नको – नगरसेवक वाघेरे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली. पोस्टसोबत एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे. अजितदादांसोबतच्या ३५ वर्षांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देताना, ” ३५ वर्षांची मैत्री तोडून दादा इतक्या लवकर गेले, हा माझा त्यांच्याशी कायमचा वाद राहील,” अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजितदादांची आणि माझी मैत्री १९८५ पासून होती. आम्ही जवळपास एकाच वेळी सार्वजनिक जीवनात आलो आणि ३५ हून अधिक वर्षे एकत्र काम केले. सुख, दुःख, यश, अपयश या सर्व भावना एकत्र अनुभवल्या. आमचे अनेक बाबतीत एकमत सुद्धा असे आणि काही बाबतीत वेगवेगळे मत देखील असे पण चर्चा करून आम्ही एकमतावर… pic.twitter.com/1iHyzbzIKq
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 22, 2026
अजितदादांसोबतच्या सहवासाबद्दल सांगताना जयंतराव पाटील म्हणाले की, “आमची मैत्री १९८५ पासूनची होती. आम्ही जवळपास एकाच काळात सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि तब्बल ३५ हून अधिक वर्षे एकत्र काम केले. या प्रवासात सुख-दुःख, यश-अपयश अशा प्रत्येक टप्प्याचे आम्ही साक्षीदार ठरलो. अनेक मुद्द्यांवर आमचे एकमत असे, तर काही विषयांवर मतभेदही होत. मात्र प्रत्येक वेळी सखोल चर्चा करून आम्ही एकमताचा मार्ग काढायचो.”
जयंत पाटील यांची पोस्ट
अजितदादांची आणि माझी मैत्री १९८५ पासून होती. आम्ही जवळपास एकाच वेळी सार्वजनिक जीवनात आलो आणि ३५ हून अधिक वर्षे एकत्र काम केले. सुख, दुःख, यश, अपयश या सर्व भावना एकत्र अनुभवल्या. आमचे अनेक बाबतीत एकमत सुद्धा असे आणि काही बाबतीत वेगवेगळे मत देखील असे पण चर्चा करून आम्ही एकमतावर यायचो. दादांच्या वाढदिवसाला न चुकता शुभेच्छा देण्याचा दर वर्षीचा रिवाज या वर्षी मोडला. ३५ वर्षांची मैत्री तोडून दादा लवकर गेले, हा माझा त्यांच्याशी वाद कायम राहील. ‘ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ‘ असे म्हणण्याची इच्छा होत नाही. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, दादा…





