Lok Sabha Election Phase 4 Voting: आज देशात लोकसभा निवडणुक 2024 च्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. 10 राज्यांमध्ये 96 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत 1717 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. आज ज्या जागांवर मतदान होत आहे त्यात आंध्र प्रदेशातील 25, तेलंगणातील 17, बिहारमधील 5, झारखंडमधील 4, मध्य प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 11, ओडिशातील 4, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 8 जागांचा समावेश आहे. आणि जम्मू – काश्मीरमधील एक जागा समाविष्ट आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदानाच्या चौथ्या टप्प्यात आज दुपारी 3 वाजेपर्यंत 52.60% मतदान झाले. तर महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान झाले आहे.
महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान
नंदुरबार – 49.91
जळगाव- 42.15
रावेर – 45.26
जालना – 47.51
संभाजी नगर – 43.76
मावळ -36.54
पुणे – 35.61
शिरूर- 36.43
नगर- 41.35
शिर्डी -44.87
बीड – 46.49