संगमनेर – संगमनेर बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डात आज (सोमवार) झालेल्या कांदा लिलावात एकूण 10 हजार 605 गोण्या कांद्याची आवक झाली.
आज झालेल्या लिलावात चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 1700 ते 2301 रुपये भाव मिळाला.
दोन नं. कांद्याला 1300 ते 1600 रुपये, तीन नं. कांद्याला 800 ते 1200 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 800 रुपये भावाने विकला गेला. तसेच डाळिंबाची एकूण 2 हजार 560 क्रेट्स आवक झाली.
त्यात 1 नंबर डाळिंबास प्रतिकिलो 151 ते 200 रुपये, 2 नं. डाळिंब 111 ते 121 रुपये, 3 नं. डाळिंब 75 व 95 रुपये, 4 नं. डाळिंब 20 ते 45 रुपयांप्रमाणे भाव मिळाला. टोमॅटोची एकूण 9 हजार 600 क्रेट्स आवक झाली. त्यास 900 ते 2 हजार 600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. उत्पादकांनी कांदा, डाळिंब, टोमॅटो, तसेच इतर शेतमाल संगमनेर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी केले आहे.