गुजरातमध्ये ९० किलो ड्रग्ज जप्त; १४ पाकिस्तानींना अटक
Updated On:

कांडला – भारतीय तटरक्षक दलाने रविवारी गुजरात सागरी सीमेवर केलेल्या कारवाईत १४ पाकिस्तानींना अटक केली. यातील सात जणांना ९० किलो ड्रग्जसह पकडण्यात आले.
अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, गुजरात एटीएस आणि तटरक्षक दलाने संयुक्तपणे गुजरातच्या किनारपट्टी भागात ऑपरेशन केल्याचे वृत्त आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
यासंबंधीची गुप्त माहिती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. यानंतर एजन्सींनी मिळून पूर्ण तयारीने अंमली पदार्थांची तस्करी रोखली. या भागात सातत्याने विविध मार्गाने पाकिस्तान ड्रग्ज तस्करी करताना दिसून येत आहे.





