दुर्दैवी घटना.! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात ९ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
Updated On:

परभणी – परभणी शहरातील साबळे गल्ली परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जुनेशा तौफिक कुरेशी (९ महिने) या चिमुकलीचा उपचारादरम्यान रविवार मृत्यू झाला. परभणी येथील एका खासगी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. या
बाबत अधिक माहिती अशी की, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी साबळे गल्ली येथील राहत्या घरासमोर जुनेशा ही बहिणीच्या कडेवर असताना परिसरातील कुत्र्याने अचानक तिच्यावर हल्ला केला.
यावेळी कुत्र्याच्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली होती. या घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.





