खडकवासला धरणातून मुठा नदीत 848 क्यूसेक पाण्याचा विसर्ग
Updated On:

पुणे : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीच्या पात्रात आज (शुक्रवार) संध्याकाळी 5 वाजल्यापासून 848 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. याबाबत खडकवासला धरण प्रशासनाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्याच्या परिस्थितीनुसार विसर्गात बदल होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याचा विसर्ग आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी आणि संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नदीकाठच्या परिसरातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला असून, नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असेही प्रशासनाने सुचवले आहे.



