विश्वकर्मा विद्यापीठ, पुणेचा ६वा पदवीदान सोहळा संपन्न

पुणे – विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे यांनी २०२४ च्या पदवीधरांचा सन्मान करत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या यशस्वी पूर्णत्वाचा आनंद साजरा केला. या समारंभात यश, अभिमान आणि भविष्याबद्दलच्या अपेक्षा यांचे सुंदर दर्शन घडले.
पदवीदान समारंभात एकूण ८५० विद्यार्थ्यांना विविध पदवी, पदव्युत्तर, पीएचडी आणि डिप्लोमा कोर्सेसमधील पदव्या प्रदान करण्यात आल्या. विविध शाखांमधील विद्यार्थ्यांचा यात समावेश होता: ( Vishwakarma University, Pune )
– आर्किटेक्चर – ४४
– आर्ट आणि डिझाईन – ८४
– वाणिज्य आणि व्यवस्थापन – १६७
– मानव्य आणि समाजशास्त्र – १४२
– विधी – ११४
– मीडिया आणि कम्युनिकेशन – १५
– फार्मसी – ९६
– विज्ञान आणि तंत्रज्ञान – १८८
समारंभाचे मुख्य अतिथी डॉ. अभय फिरोदिया, चेअरमन, फोर्स मोटर्स लि. यांनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर आधारित कौशल्ये विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “घाबरू नका. आपली संस्कृती टिकून राहणार आहे, यावर ठाम विश्वास ठेवा,” असे आवाहन त्यांनी केले. भारताची २१व्या शतकातली प्रगती अधोरेखित करत त्यांनी पदवीधरांना प्रेरणादायी, आशावादी जीवन जगण्यासाठी आणि समाजात अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केले.
विश्वकर्मा विद्यापीठाचे अध्यक्ष भारत अगरवाल यांनी पदवीधरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि भविष्यातील यशस्वी प्रवासात त्यांना एकमेकांशी तसेच विद्यापीठाशी संपर्कात राहण्याचे आवाहन केले. “माझी विनंती आहे की, तुम्ही एकमेकांशी तसेच विद्यापीठाशी देखील संपर्कात राहा. आपल्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी विविध संधी उपलब्ध आहेत. तसेच, नवीन विद्यार्थ्यांशी तुमचे अनुभव शेअर करण्यासाठी आम्ही तुम्हाला विद्यापीठात नक्की आमंत्रित करू,” असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी आणि मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे पुढच्या पिढीतील नेत्यांची जडण-घडण झाली आहे.
२०२४ चा पदवीधर विद्यार्थी त्यांच्या जीवनातील नवीन प्रवासासाठी सज्ज होत असताना ते समाजात उत्तम कार्य करणार आणि दीर्घकालीन योगदान देणार, याविषयी विश्वकर्मा विद्यापीठातर्फे खात्री व्यक्त करण्यात आली. ( Vishwakarma University, Pune )





