Pune District : जुन्नर येथे 600 किलो गोमांस जप्त
Updated On:

जुन्नर : एका महागड्या कारमधून सुमारे 600 किलो गोमांस संगमनेर येथून पुणे येथे विक्री करिता घेऊन जात असताना नारायणगाव येथे ही चारचाकी गोरक्षक व पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता न थांबता वेगाने जुन्नर बाजूकडे ती गेलेली असताना जुन्नर पोलीस पथकाने पाठलाग करीत जुन्नरमध्ये ही कार अडवली; परंतु तिच्यातील तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदं रजा शेख व इतर दोन जण (सर्व रा. जुन्नर) यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरक्षक शिवराज संगनाळे यांनी फिर्याद नोंद केली आहे. फरारी तरुणांचा शोध सुरू असून पुढील तपास सहायक फौजदार भगवान गिजरे करीत आहेत.





