Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेकजणांनी ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. मुंबई, नवी मुंबई, कोकण, ठाण्यातील ठाकरेंचे अनेक शिवसैनिक शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहे. Eknath Shinde | नुकतेच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द गटातील ठाकरे गटातील उपतालुकाप्रमुख निलेश गुंजाळ, गणप्रमुख सकत खुळे, झोळेचे उपसरपंच मेजर गोविंद खर्डे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. Uddhav Thackeray | अशातच आता नवी मुंबई आणि ठाण्यामधील ५५ नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे १० नगरसेवक होते. नवी मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनचे फक्त दोन नगरसेवक उरले होते. गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना नवी मुंबईमध्ये मोठा धक्का बसला आहे. तसचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याही अनेक नगरसेवेकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश कार्यक्रम ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदाश्रमात पार पडला. यावेळी खासदार नरेश म्हस्के हे उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव टाकरेंना हा मोठा हादरा बसल्याचे बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे. Uddhav Thackeray | अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक शिंदे गटात अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. जिल्ह्यातील संगमनेर खुर्द गटातील ठाकरे गटातील उपतालुकाप्रमुख निलेश गुंजाळ, गणप्रमुख सकत खुळे, झोळेचे उपसरपंच मेजर गोविंद खर्डे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. Eknath Shinde |