54th GST Council Meeting: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 54वी जीएसटी कौन्सिलची बैठक झाली. या सभेवर केवळ उद्योगसमूहाचेच नव्हे तर सर्वसामान्यांचेही विशेष लक्ष होते. खरं तर, जीएसटी कौन्सिलच्या या बैठकीकडून उद्योग जगतासोबतच देशातील सर्वसामान्य जनतेलाही मोठ्या अपेक्षा होत्या. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत दरवेळेप्रमाणेच यावेळीही अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. जीएसटी कौन्सिलने सध्या 2,000 रुपयांपेक्षा जास्त ऑनलाइन पेमेंटवर जीएसटी लागू करण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला आहे.
1. कॅन्सरचे औषध स्वस्त होईल –
जीएसटी कौन्सिलने कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील जीएसटी कमी करून 5 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत कर्करोगाच्या औषधांवर 12 टक्के जीएसटी लावला जात होता. सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे कर्करोगावरील उपचाराचा खर्च कमी होणार आहे.
2. विमा पॉलिसी प्रीमियम स्वस्त असेल –
आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीच्या प्रीमियमवर आकारण्यात येणारा 18% GST कमी करण्यावर सहमती झाली आहे. मात्र, आता प्रीमियमवर किती जीएसटी आकारला जाईल, याचा अंतिम निर्णय नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीत घेतला जाईल.
3. GoM च्या निर्मितीवर एकमत –
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, GST कौन्सिलच्या बैठकीत मंत्रिगटाच्या स्थापनेवर सहमती झाली आहे.
4. नमकीनच्या किमती कमी होतील –
जीएसटी कौन्सिलने नमकीनवरील जीएसटी 18 वरून 12 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.
5. दिल्लीबाहेरही बैठक होणार –
आत्तापर्यंत जीएसटी कौन्सिलची बैठक फक्त दिल्लीतच होते, 55वी बैठकही दिल्लीत होईल आणि त्यानंतर 56वी बैठक दिल्लीबाहेर इतर राज्यांमध्ये होऊ लागेल.
6. सेवांच्या आयातीवर सूट –
जीएसटी कौन्सिलने परदेशी विमान कंपन्यांद्वारा सेवा आयातीवर सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
7. कार सीट महाग होतील –
कार सीटवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला आहे.
8. हेलिकॉप्टरने तीर्थयात्राही स्वस्त होईल –
जीएसटी परिषदेने हेलिकॉप्टर यात्रेवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्याची मागणी मान्य केली आहे.
9. ऑनलाइन गेमिंग –
ऑनलाइन गेमिंगच्या महसुलात 412% ची मोठी वाढ झाली आहे आणि केवळ 6 महिन्यांत संकलन 6,909 कोटी रुपये झाले आहे. ऑनलाइन गेमिंगवर सरकार 28 टक्के जीएसटी आकारते.
10. कॅसिनोमधून मिळणारे उत्पन्नही वाढले –
सरकारला कॅसिनोमधून मिळणाऱ्या महसुलातही 30 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. कॅसिनोवर 28 टक्के जीएसटी लागू करण्यात आला असून या बैठकीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.