कापूस उत्पादकतेसाठी 5 वर्षांचे अभियान जाहीर; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

Union Budget 2025 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांनी कृषी क्षेत्र, उद्योग, शिक्षण क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे किसान क्रेडिट कार्डसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरुन 5 लाखांपर्यंत वाढवलीभाज्या आणि फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी, त्यांचा कार्यक्षम पुरवठा करण्यासाठी राज्यांच्या भागीदारीत व्यापक कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. याशिवाय कापूस उत्पादकतेसाठी 5 वर्षांचे अभियान जाहीर करण्यात आला आहे.
डाळींमध्ये स्वावलंबी होण्यासाठी सरकार 6 वर्षांचा कार्यक्रम सुरू करणार असून, तूर, उडीद आणि मसूर या पिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि किफायतशीर दर देण्यासाठी व्यापक कार्यक्रम सुरू केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, बजेट 2025 मध्ये खासकरून गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांच्या विकासावर भर देण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. त्यानुसार, विविध योजना या घटकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. जुन्या योजनांची मर्यादा वाढवण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. तर महिलांची अनेक स्टार्टअप्स आणि लघु, मध्यम उद्योगातील सक्रियता वाढवण्यासाठी बजेटमध्ये घोषणा होत असल्याचे दिसत आहे.





