तेलंगणात प्रवासी वाहन चालकांना ५ लाखांचा अपघात विमा

हैदराबाद (तेलंगणा) – तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी छोट्या प्रवासी वाहन चालकांसाठी ५ लाख रुपयांचा अपघाती विमा योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. याचा लाभ अन्न वितरण, कॅब आणि ऑटो रिक्षा चालवणे आणि वैद्यकीय सेवा देणारे वाहन चालक यांना होणार आहे.
या चालकांना राजीव आरोग्यश्री योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमाही दिला जाणार आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी ओलाच्या धर्तीवर टी-हबद्वारे विकसित केलेले अॅप उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन दिले.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी नुकतीच नामपल्ली प्रदर्शन मैदानावर कॅब ड्रायव्हर्स, फूड डिलिव्हरी बॉय आणि ऑटो ड्रायव्हर्सना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. त्यात त्यांनी ही आश्वासने दिली आहेत. या चालकांच्या सामाजिक सुरक्षेची जबाबदारी सरकार घेईल, असे त्यांनी नमूद केले.





