पुणे -रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने मागील 7 महिन्यात विविध स्थानकांवर आढळलेल्या सुमारे 477 बालकांना पालकांच्या हाती सुपूर्द केले आहे. यापैकी पुणे विभागात सर्वाधिक म्हणजेच 171 बालके आढळली आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 7 महिन्यांत सुमारे 477 मुलांना पालकांना सुपूर्द केले असून, यात 310 मुले आणि 167 मुलींचा समावेश आहे.
जुलै महिन्यातच विविध स्थानकांतील 73 बालकांची सुटका करण्यात आली. 14 जुलै रोजी हडपसर रेल्वे स्थानकात देखील 14 वर्षीय मुलगी आढळली होती.