2030 पर्यंत यंत्रमानव करणार 40 टक्के कामे; पण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे खाजगी आयुष्य धोक्यात येणार

वॉशिंग्टन – गेल्या काही वर्षांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा म्हणजेच यंत्रमानव तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे एका नवीन संशोधनाप्रमाणे 2030 पर्यंत घरातील 40% पेक्षा जास्त कामे यंत्रमानव करू शकतील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्यामुळे माणसाचे खाजगी आयुष्य धोक्यात येणार असल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. ब्रिटन आणि जपान मधील 65 पेक्षा जास्त तज्ञांच्या मुलाखती घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला असून,
2030 पर्यंत सर्वसामान्य आयुष्यातील अनेक कामे यंत्रमानवच करतील घरातील 40% पेक्षा जास्त कामे यंत्रमानव करू शकतात त्याच प्रकारे सार्वजनिक व्यवहारांमधील दुकानांमधील बिले तयार करणे वस्तूंची विक्री करणे आणि वस्तूंची मांडामांड करणे यासारख्या गोष्टी सुद्धा यंत्रमानवांच्या माध्यमातून केला जाऊ शकतात घरात फरशी पुसणे भांडी घासणे किंवा स्वयंपाक करणे यासारखी कामेसुद्धा यंत्रमानवांच्या माध्यमातून करता येणे शक्य आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील तज्ञ एकटेरीना हरतोग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करताना यंत्रमानवाला अनेक सूचना दिल्या जातात या सूचना त्याच्या सिस्टीम मध्ये रेकॉर्ड होतात साहजिकच आपल्या खाजगी आयुष्यावर एक प्रकारे यंत्रमानवाचे सतत निरीक्षण चालू असते. म्हणजेच या तंत्रज्ञानामुळे माणसाचे खाजगी आयुष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अजून महाग आहे सर्वसामान्य नागरिकांना हे तंत्रज्ञान एवढ्यात परवडेल असे वाटत नाही पण आगामी कालावधीमध्ये या तंत्रज्ञानामध्ये अजून सुधारणा झाल्यानंतर अतिशय अल्प दरात हे तंत्रज्ञान सामान्य लोकांनाही उपलब्ध होऊ शकते पण या तंत्रज्ञानाचा वापर करून दैनंदिन कामे करत असतानाच आपले खाजगी आयुष्य जपण्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे.





