पुणे | पहिल्याच दिवशी 357 इच्छुकांनी अर्ज नेले
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यात विधानसभेच्या 21 जागांसाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मंगळवारी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल. दरम्यान, इच्छुकांनी मंगळवारपासून अर्ज घेण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील विधानसभेच्या 21 जागांसाठी 357 इच्छुकांनी अर्ज नेले आहेत.
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 29 अॉक्टोबर आहे. आता अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवस राहिले आहेत. त्यामुळे येत्या एक -दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्याची वेळ ही सकाळी 11 ते दुपारी तीन अशी आहे.
पुणे शहरातील मतदारसंघ – इच्छुकांनी नेलेले अर्ज
वडगावशेरी – 26
शिवाजीनगर – 10
कोथरुड – 12
पर्वती- 19
हडपसर – 19
पुणे कॅन्टोन्मेंट – 17
कसबा पेठ – 16
खडकवासला – १९





