Parbhani News | माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्य शासनाने पाथरी शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याचा निणर्य घेतला आहे. राज्याच्या महसूल विभागाने एसआयटी स्थापन करण्याबाबतचे परिपत्रक जारी केले असून छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली याबाबत चौकशी होणार आहे. काय आहे प्रकरण ? अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार साजिद पठाण यांनी लक्षवेधी मांडून पाथरी शहरामध्ये अवैध बांधकाम केल्याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. सदरील बांधकामात माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा सहभाग असल्याचंही आमदार साजिद पठाण यांनी सभागृहात सांगितले होते. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच याबाबत एक समिती नेमून अहवाल मागून घेत कारवाई केली जाईल अशी घोषणा केली होती.Parbhani News | दरम्यान, विधानसभा निवडणुकीत बाबाजी यांनी पाथरी विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले होते. त्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे मागच्या महिन्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. सर्व तयारी करण्यात आली होती, मात्र ऐन वेळी हा प्रवेश झाला नाही आणि बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची साथ सोडत काँग्रेसची वाट धरली. Parbhani News | दुर्राणी यांच्याकडून राहुल गांधींची स्तुती काँग्रेसमध्ये प्रवेश करताच दुर्राणी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर स्तुतीसुमने उधळली. अल्पसंख्याक समाजाला केवळ काँग्रेसच न्याय देऊ शकतं. भाजपासारख्या बलाढ्य नेत्याचा केवळ राहुल गांधीच सामना करू शकतात. परभणी जिल्ह्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष करणार असल्याचा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवला होता. त्यानंतर आता थेट त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तीन महिन्यात चौकशी करण्याचे आदेश एसआयटीने तीन महिन्यात संपूर्ण चौकशी करून शासनाला अहवाल देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. SIT मध्ये विभागीय आयुक्त परभणी, अप्पर जिल्हाधिकारी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय, संचालक नगर रचना व मूल्य निर्धारण संचालनालय पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Parbhani News | हेही वाचा : अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकला भारताच्या सडेतोड उत्तराने लागली मिरची ; पुन्हा ओकली गरळ