दिवाळीच्या फराळासह 3000 रुपये; रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटल्याचा आरोप

Sanjaykaka Patil Alligation On Rohit Patil | विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान सांगलीतील राजकीय वातावरण तापले आहे. तासगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांनी पैसै वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.
रोहित पाटलांचे कार्यकर्ते फराळाच्या बॉक्समधून तीन हजार रुपये वाटत असल्याचा आरोप संजयकाका पाटील यांच्या समर्थकांनी केला आहे. यानंतर संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले आहे. त्यामुळे मतदारसंघासह सांगली जिल्ह्यातही या घटनेची चर्चा सुरू आहे.
रोहित पाटील प्रचार करत पुढे जात होते, त्यांच्या मागोमाग कार्यकर्ते पैसे वाटत होते. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडल्याचा दावा संजय काका पाटलांनी केला आहे. तासगाव शहरातील साठेनगर भागात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
रोहित पाटील यांचा खरा मुखवटा जनतेसमोर आला आहे.चेष्टा लावली आहे अतिशय निंदनीय प्रकार आहे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. निवडणुकीमध्ये सहानुभूतीच राजकारण करणाऱ्या रोहित पाटलांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. जनता अशा लोकांना धडा शिकवेल, असे संजय पाटील म्हणाले आहे.
हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास हजारो लोक पोलीस ठाण्यासमोर येऊन बसणार असल्याचा इशारा संजय काका पाटलांनी दिला आहे. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच तासगाव शहरातील या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा:





