Nagar | शिर्डीतील कार्यक्रमास 3 हजार महिला जाणार

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे होणाऱ्या महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी श्रीरामपूर तालुक्यातून सुमारे तीन हजार महिला उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी, दि.२७ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कार्यक्रम होणार आहे. यासाठी प्रशासनाने तालुक्यातून तीन हजार महिला नेण्याचे नियोजन केले आहे. यासाठी एस.टी.महामंडळाच्या ७५ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक बससाठी प्रत्येकी एक नोडल अधिकारी व एक सहायक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.शिवाय प्रत्येक बससाठी एक आरोग्य कर्मचारी व एका आशा वर्कर किंवा अंगणवाडी सेविका नियुक्त असणार आहे.
हे सर्व नियोजन करण्यासाठी तालुक्यात कंट्रोल रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय सात ते आठ गाड्यांमागे एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. एका बसमध्ये ४० महिला असून प्रत्येक महिलेला नाश्ता व पाणी बॉटलची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरी भागासाठी २५ तर ग्रामीण भागासाठी ७५ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व महिलांची फोन नंबरसह यादी तयार करण्यात आली असून प्रत्येक महिलेला बस क्रमांकासह पास देण्यात येणार आहे.





