पिंपरी | पथविके्रता समिती निवडणुकीच्या रिंगणात 29 उमेदवार

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पथविक्रता समिती निवडणकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, उद्या (दि.20) या समितीच्या एकूण आठ जागांकरिता गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. अनेक पुढार्यांच्या चार पॅनेलस काही अपक्ष असे एकून 29 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सर्वसाधारण पुरूष प्रवर्गाच्या एकूण 2 जागांकरिता सर्वाधिक एकूण दहा उमेदवार आपले नशिब आजमवत आहेत. याशिवाय सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गाची एक जागा व उसूचित जाती राखीव प्रवर्गाकरिता प्रत्येकी 5 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
याशिवाय अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक व इतर मागास प्रवर्गाच्या प्रत्येकी 1 राखीव जागेकरिता प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात आहेत. तर दिव्यांग प्रवर्गातील महिला राखीव पदाकरिता एकून तीन महिलांमध्ये लढत होणार आहे.
एकता पॅनेलचे एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये सुरेश मारुती कर्डिले,गिरीष विलास बेंद्रे, कांचन महेश मांढरे, उत्तम रंगा सकटे व सारिका बाबुसिंग राजपूत या उमेदवारांचा समावेश आहे.
फेरीवाला हॉकर्स महासंघाचे एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये किरण श्रीधर साडेकर, राजू विलास बिराजदार, संगीता दत्तात्रय शेरखाने, प्रल्हाद रामभाऊ कांबळे, किसन रामा भोसले, सलीम बाबालाल डांगेव अलका सुनील रोकडे या उमेदवारांचा समावेश आहे.
टपरी, पथारी, हातगाडी पंचायत व कष्टकरी पंचायतीच्या वतीने पथविक्रता समितीच्या सर्व एकूण 8 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
यामध्ये बळीराम काकडे, दामोदर मांजरे, आशा कांबळे, रमेश शिंदे, शुभांगी मोरे, ममता मानुरकर, कलीम शेख उर्फ मलिक व वासंती जाधव हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
याशिवाय अपक्ष उमेदवार तुषार उर्फ व्यंकटेश जयसिंग गाडे हेदेखील या निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमवत आहेत. याव्यतिरिकत आणखी आठ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सर्वसाधारण पुरुष गटात सर्वाधिक चुरस
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पथविक्रता समितीच्या निवडणुकीत सर्वसाधारण पुरूष प्रवर्गाच्या एकूण 2 जागांकरिता सर्वाधिक एकूण दहा उमेदवार आपले नशिब आजमवत आहेत. अन्य जागांच्या तुलनेत या प्रवर्गात सर्वाधिक चुरस पहायला मिळत आहे.





