पुणे जिल्हा | पुरंदर-हवेलीसाठी 14 इच्छुकांकडून 29 अर्ज

सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे.
उमेदवारी भरण्यासाठी सुरुवात झाली असून मंगळवारी (दि. 22) पहिल्याच दिवशी 14 इच्छुक उमेदवारांनी 29 नामनिर्देशन पत्र खरेदी केले आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रे जुळवण्यासाठी वेळ दिला असून काही उमेदवार आपल्या नियोजित दौर्यामध्ये व्यस्त आहेत तर अद्यापपर्यंत अधिकृत पक्षांकडून कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आले नसून बंडखोरी मात्र मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे चित्र पुरंदरमध्ये दिसत आहे.
इच्छुक उमेदवार मंगळवार (दि. 29) पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज करू शकतात. मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 14 इच्छुक उमेदवारांमार्फत एकूण 29 अर्ज नामनिर्देशन व्यवस्थापन कक्षामधून प्राप्त करून घेतले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.
पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये आदेश खटाटे झेंडेवाडी, किशोर गिरमे (सासवड), अनिल गायकवाड, (पिंगोरी) जालिंदर जगताप (सासवड), चंद्रकांत भिंताडे (भिवडी), अमोल हरपळे (भेकराईनगर),
हर्षल भोंगळे (सासवड), विकास भोसले (भोसलेवाडी), महादेव खेंगरे (खेंगरेवाडी), सुरेश वीर (पिंपरे खुर्द), अतुल नागरे (तोंडल), उमेश जगताप (जेजुरी), विशाल पवार (सासवड) या इच्छुक उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र खरेदी केले आहेत.





