पुणे जिल्हा | आमदार जगतापांची भाजप उपाध्यक्षाला शिवीगाळ

सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाला निधी मिळत नसल्याने आमदार संजय जगताप यांनी नाराजी व्यक्त केल्याचा एक व्हिडिओ पुरंदर तालुक्यातील भाजपचे उपाध्यक्ष हनुमंत मुरलीधर काळाणे यांनी व्हायरल केला होता.
आमदार जागताप यांनी काळाणे यांना हा व्हिडिओ का व्हायरल केला असा म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात जावून भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, तालुका अध्यक्ष निलेश जगताप, गंगाराम जगदाळे, शेखर वढणे, श्रीकांत ताम्हाणे, सचिन लबाते, संतोष जगताप, गणेश मेमाणे, बाळासाहेब भोसले,
मंगल पवार, महादेव शेंडकर, अलका शिंदे, सुरेंद्र जेध, अमोल जगताप, अरुण न्हालवे, दिलीप कटके, संदीप कटके, श्रीकांत राणे आदी उपस्थित होते. आमदार संजय जगताप यांच्याशी संपर्क साधला असता असे काही घडले नाही असे त्यांनी सांगितले.





