पुणे जिल्हा | पुरंदर-हवेली विधानसभेसाठी मनसे रिंगणात

जेजुरी, (वार्ताहर) – पुरंदर-हवेलीची येत्या विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी मनसे लढवणार असून सध्या गाव तेथे शाखा आणि वस्ती तेथे मनसे सैनिक ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन व सुविधा मिळाल्या पाहिजेत याकडे लक्ष देणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर यांनी सांगितले.
जेजुरी येथिल कडेपठार मार्गावरील सभागृहात सोमवारी (दि. 5) विधानसभा आढावा बैठक घेण्यात आली. तसेच सासवड, जेजुरी शहरासह जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष उमेश जगताप यांच्यासह सुमारे 150 कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षस्थापनेपासून जेजुरीचे उमेश जगताप हे पक्षाचे एकनिष्ठपणे काम करत आहेत गेली 6वर्षापासून ते तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत राहताना सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याच नावाची शिफारस मनसे प्रमूख राज ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे अॅड. सुधीर पाटसकर यांनी सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महेश शिंदे यांनी आभार मानले.
नियुक्या झालेले पदाधिकारी
रोहित हरिदास पवार (सासवड शहराध्यक्ष), श्रीयश पोपट जगताप (जेजुरी), नितीन रमेश जगताप (माळशिरस गट), निलेश ज्ञानेश्वर जाधव (नीरा-कोळविहिरे गट), राजेंद्र सुनील बनकर (वीर-परिंचे गट)





