पिंपरी, – (प्रतिनिधी) – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचार संहिता जिल्ह्यात 15 ऑक्टोबर रोजी लागू झाल्यानंतर पहिल्या 24 तासात पिंपरी , चिंचवड व मावळ या तीन मतदारसंघात प्रशासनाच्यावतीने शासकीय इमारती आणि शासकीय मालमत्तेच्या आवारातील जाहिरात फलके, भित्तीपत्रके, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज आदी एकूण 2752 प्रचारसाहित्य तात्काळ प्रभावाने हटविण्यात आले आहेत, अशी आचारसंहिता कक्षाच्या समन्वयक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे. मावळ विधानसभा मतदासंघात 1 हजार 154, चिंचवड मतदार संघात1 हजार 7 , पिंपरी (अ.जा.) 38, तर भोसरी मतदार संघात 653 जाहिरात साहित्य हटविण्यात आले.यामध्ये फलके, होर्डिंग्ज, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज यांचा समावेश आहे. या चारही विधानसभा मतदार संघातील शासकीय मालमत्तेवरील एकूण 2752 प्रचारसाहित्य हटविण्यात आले आहेत. यामुळे शासकीय मालमत्तांनी मोकळा श्वास घेतला आहे.