पिंपरी | नदी प्रदुषण नियंत्रणसाठी २००० कोटींचा निधी

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांना प्रदुषणाचा विळखा पडला आहे. उगम स्थानापासूनच लगतच्या गावांतून, शहरी भागातून तसेच औद्योगिक वसाहतींमधून थेट दुषीत व रसायण मिश्रीत पाणी सोडले जाते.
त्यामुळे होणारे नदी प्रदुषण रोखण्यासाठी नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात सुमारे २००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरण क्षेत्र येथील उगमस्थानापासून पवना नदीपात्रात सांडपाणी सोडले जाते. ग्रामपंचायती, नगरपंचायती, कॅन्टोन्मेंट बोर्ड, महापालिके क्षेत्रातील भागातून दुषीत पाणी नदीपात्रात सोडले जात असल्यामुले पवनेचे पात्र दुषीत झाले आहे.
लगतच्या औद्योगिक पट्ट्यातून रसायन मिश्रीत पाणी सोडले जात असल्यामुळे थेरगाव येथील केजुबाई बंधारा येथे नदीपात्रात पांढरा फेस तयार होतो. त्यामुळे नदीपात्रात शेकडो मृत मासे आढळून आले आहेत.
या रसायनयुक्त पाण्यामुळे नदीपात्रातील जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच, इंद्रायणी नदीपात्राची याहून वाईट अवस्था झाली असून करोडो रुपये खर्च करुनही इंद्रायणीचे प्रदुषण रोखता आलेले नाही.
नदीच्या उगमस्थानापासूनच लगतची गावे, औद्योगिक आस्थापना तसेच छोट्या-मोठ्या कंपन्यांकडून प्रक्रिया न केलेले पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते.
परिणामी, आळंदी येथील जुन्या बंधा-याखाली प्रचंड फेस तयार होतो. त्यामुळे नदीची पावित्र्य निष्ट होत चालले आहे. मुळा नदी पात्राची देखील अशीच अवस्था झालेली आहे.
पवना, इंद्रायणी आणि नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी पीएमआरडीएने नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्प राबविण्यासाठी सुमारे २००० कोटींची आर्थिक तरदूत २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात केली आहे.
७९३
१९७
९७७
एकूण १९६७ कोटी





