पुणे | ड्रेनेज लाइनचे सूक्ष्म नियोजन करावे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोथरूड परिसरात पुनर्विकास प्रकल्पांची संख्या लक्षात घेऊन ड्रेनेजलाइन टाकण्याचे सूक्ष्म नियोजन करावे. यासाठी तज्ज्ञ नेमून मोठ्या व्यासाची ड्रेनेज व्यवस्था निर्माण करावी. त्वरीत यासाठी आवश्यक तो निधी राखीव ठेवावा, अशी मागणी शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.
सुतार यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार, कोथरूड भागाचा विकास साधारण ३५ ते ४० वर्षापूर्वी झाला.
पुणे शहरातील एक सुनियोजित भाग म्हणून कोथरूड ओळखला जातो. हा भाग विकसित होत असताना प्रथम तेथील मूलभूत सुविधा (ड्रेनेज लाइन, पाण्याची लाइन, रस्ते, वीज ) अशा निर्माण केल्या गेल्या. त्यामुळे कोथरूड झपाट्याने विकसित होत गेले.
तसेच आशिया खंडातील सर्वांत वेगाने विकसित होणारे उपनगर म्हणून कोथरूडची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. हे सर्व पाहता येथे सुविधा देण्यासाठी महापालिकेने त्याचा गांभिर्याने त्याचा विचार करावा, अशी मागणी सुतार यांनी केली आहे.





