Ayush Mhatre Century : आयुष म्हात्रेचा डबल धमाका! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ठोकले सलग दुसरे शतक

आयुष म्हात्रेने आपल्या शतकी खेळीत 5 चौकार आणि 9 गगनभेदी षटकार मारले. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने आंध्र प्रदेशने दिल्ली 160 धावांचे लक्ष्य 28 चेंडू शिल्लक असतानाच गाठले. आयुष म्हात्रेने या स्पर्धेत सलग दुसरे शतक ठोकले आहे. यापूर्वीच्या सामन्यात त्याने विदर्भविरुद्धही नाबाद शतक झळकावले होते.
सलग दुसऱ्या सामन्यात ठोकलं नाबाद शतक –
Ayush Mhatre’s SMAT 2025 carnage continues! 👊
Already launched five sixes on his way to a rapid fifty in Mumbai’s chase of 160! 🔥
A generational talent in the making! 💪#SMAT2025 #AyushMhatre | 📸 :JioStar pic.twitter.com/qDvcRMiemU
— OneCricket (@OneCricketApp) November 30, 2025
मागील दोन टी-20 सामन्यांमध्ये त्याने एकूण 214 धावा केल्या असून तो एकदाही बाद झालेला नाही. याचसोबत, म्हात्रे या मोसमात स्पर्धेत सर्वाधिक धावा (3 सामन्यांत 232 धावा) करणारा फलंदाज बनला आहे. मुंबईच्या विजयात गोलंदाज तुषार देशपांडे (4 षटकांत 25 धावा देऊन 3 विकेट्स) आणि सूर्यकुमार यादव (21 चेंडूंमध्ये नाबाद 31 धावा) यांचाही मोलाचा वाटा राहिला.
हेही वाचा – IND vs SA : विराटने शतक पूर्ण करताच रोहितचा सुटला संयम! टाळ्या वाजवताना दिली शिवी, पाहा VIDEO
अभिषेक शर्माचेही वादळ! 310 धावांचा डोंगर
दुसऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात पंजाबकडून खेळणाऱ्या अभिषेक शर्मानेही कहर केला. मोहम्मद शमी आणि आकाश दीपसारख्या गोलंदाजांचा समावेश असलेल्या बंगालच्या संघाविरुद्ध त्याने केवळ 52 चेंडूंमध्ये 148 धावा ठोकल्या. अभिषेकने 16 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याने केवळ 12 चेंडूंमध्ये अर्धशतक आणि 32 चेंडूंमध्ये शतक झळकावले.
हेही वाचा – IND vs SA : विराटचं शानदार शतक अन् चाहत्याचा पाय धरण्याचा ड्रामा, रांचीच्या मैदानातील VIDEO व्हायरल
अभिषेक शर्माच्या या तुफानी फलंदाजीच्या बळावर पंजाबने बंगालसमोर 310 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल, बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने 66 चेंडूंमध्ये नाबाद 130 धावांची शानदार खेळी केली, पण तरीही त्यांची टीम 198 धावांपर्यंतच पोहोचू शकली आणि पंजाबने 112 धावांनी मोठा विजय मिळवला.





