’12 वी फेल’ चित्रपटातील अभिनेत्री मेधा शंकर नव्या सिनेमात करणार सुप्रसिद्ध अभिनेत्यासोबत काम

Medha Shankar And Rajkumar Rao| अभिनेता विक्रांत मेस्सीचा ’12 वी फेल’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री मेधा शंकर प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटातील मोठ्या यशानंतर आता मेधाच्या हाती आणखी एक चित्रपट लागला आहे. पुलकित दिग्दर्शित ‘मलिक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच दोघे एकत्र काम करणार आहेत.
’12वी फेल’मध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या मेधा शंकरचे लाखो चाहते आहेत. आता तिचे चाहते पुलकितच्या ‘मालिक’ चित्रपटात तिला राजकुमारसोबत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पुलकितने यापूर्वी भूमी पेडणेकर स्टारर भक्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून दाद दिली होती.
‘मलिक’ ह्या सिनेमाचं शुटिंग लखनऊ, वाराणसी या शहरातील विविध लोकेशन्सवर होणार आहे. सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. राजकुमार राव शेवटचा श्रीकांतमध्ये दिसला होता. यानंतर तो ‘विकी विद्या’ या चित्रपटात तृप्ती डिमरीसोबत दिसणार आहे.
दरम्यान, मेधा अभिनेत्रीसह गायिका आणि मॉडेल पण आहे. तिने करिअरची सुरुवातच मॉडलिंग आणि टिव्ही जाहिरातीतून केली. 2015 ला ‘विथ यू फोर यू ऑलवेज’ या शॉर्ट फिल्मने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. मेधाने ‘शादिस्तान’ सिनेमातून बॉलीवुडमध्ये डेब्यू केला. मात्र तिला खरी लोकप्रियता ’12 वी फेल’ या चित्रपटामुळे मिळाली.
हेही वाचा:
‘NEET परीक्षा रद्द करू नये’, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती, शपथपत्र केले दाखल





