Tax Collection : प्रत्यक्ष कर संकलनात 11% वाढ
Updated On:

नवी दिल्ली – यंदाच्या आर्थिक वर्षात आतापर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 11 टक्क्यांनी वाढ झाली असून तो 3.80 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात (17 जून 2023 पर्यंत) कॉर्पोरेशन कर 1,56,949 कोटी रुपये आणि वैयक्तिक आयकर यासह सिक्युरिटीज व्यवहार कर 2,22,196 कोटी रुपयांचा समावेश आहे.
2023-24च्या एप्रिल-जून तिमाहीसाठी आगाऊ कर संकलन 17 जूनपर्यंत 1,16,776 कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.70 टक्के वाढ दर्शवते.
याशिवाय 17 जूनपर्यंत 39,578 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढला आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष कर संकलन रु. 18.23 लाख कोटींपेक्षा जास्त होते.





