Sangli News : नगराध्यक्षपदाच्या संधीचा विसर पडला का?; आनंदराव मलगुंडे यांचा महायुतीच्या नेत्यांना थेट सवाल
तहसील कार्यालयात वजन ठेवल्याशिवाय सामान्य जनेतची कामे होत नाहीत. सामान्य माणसाची कामे सुरळीत करा, अशी भावना माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी शासनाच्या राजस्व अभियान कार्यक्रमात बोलताना (Sangli News) व्यक्त केली.

Sangli News : तहसील कार्यालयात वजन ठेवल्याशिवाय सामान्य जनेतची कामे होत नाहीत. सामान्य माणसाची कामे सुरळीत करा, अशी भावना माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी शासनाच्या राजस्व अभियान कार्यक्रमात बोलताना (Sangli News) व्यक्त केली.
यावेळी त्यांनी कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव घेतलेले नाही. मग ओबीसी अधिकाऱ्यांचे आम्हाला वावडे आहे म्हणणे, हास्यास्पद नाही का? आ.जयंत पाटील यांनी गेल्या ४० वर्षात काय विकास कामे केली आहेत, हे तालुक्यातील सामान्य जनता पहात आहे, त्यासाठी तुमच्या शिफारशीची (Sangli News) गरज नाही,असा प्रतिटोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, प्रभारी नगराध्यक्ष खंडेराव जाधव, लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, ईश्वरपूर बाजार समितीचे सभापती डॉ.अशोक पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील म्हणाले,अधिकारी हा अधिकारी असतो. तो कोणत्या समाजाचा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, असा विषय येत नाही. त्याने प्रामाणिकपणे जनतेची कामे करावीत ही अपेक्षा असते. सध्या सामान्य जनतेची कामे होत नाहीत, त्यांना हेलपाटे मारावे लागतात, टेबलावर वजन ठेवल्याशिवाय कामे होत नाहीत, हा लोकांचा अनुभव आहे.
सामान्य जनतेचा रोष आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तो तुम्हाला इतका का झोंबला? तुमची राज्यात सत्ता आहे, आपल्याकडून त्याबाबत सूचना जाणे अपेक्षित असताना आपण त्यावर राजकारण करणे दुर्दैवी आहे.
नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे म्हणाले, आपणास ओबीसीचा इतका पुळका आहे, तर मग मला उरुण ईश्वरपूर शहरातील जनतेने लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले असता, माझ्या मागे तक्रारीचे शुक्लकाष्ट कोणी लावले? आपण खुल्या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आला असतानाही आपणास अडीच वर्षे ओबीसी नगराध्यक्ष म्हणून माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनीच संधी दिली होती, हे आपण विसरला काय?
प्रभारी नगराध्यक्ष खंडेराव जाधव म्हणाले, ईश्वरपूर येथे निषेध मोर्चा झाला, तो दिल्लीच्या जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाली, त्याचा निषेध करण्यासाठी आणि दिल्ली येथील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी होता. तो वाळवा तालुक्यातील विद्यार्थी, पदवीधर व युवकांनी आयोजित केला असून कोणत्या पक्षाचा नव्हता. या मोर्चामध्ये विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आ.सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हंटल्याबद्दल तीव्र भावना संताप व्यक्त केला. संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शहाजी पाटील म्हणाले, ईश्वरपूर (Sangli News) येथील निषेध मोर्चास उत्स्फूर्तपणे आलेल्या विद्यार्थ्यांना ‘कामगार’ म्हणणे हा त्यांचा अपमान आहे. आम्ही विद्यार्थी व पालकांना कामगार म्हणणाऱ्यांचा जाहीर निषेध करतो. आ.जयंतराव पाटील यांनी उरुण ईश्वरपूर, आष्टा शहरासह वाळवा तालुक्यात, मतदारसंघात काय विकास केला आहे? हे जनतेला माहित आहे. त्यासाठी आपल्या शिफारशीची गरज नाही. आपण नगराध्यक्ष म्हणून जो विकास केला, त्यामुळेच जनतेने आपणास घरी बसविले आहे.






