Sangli News : माजी कनिष्ठ लेखाधिकार्याकडे सापडली 82 लाख 89 हजारांची बेहिशोबी मालमत्ता
Sangli News : सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याची तपासणी केली असता अण्णासाहेब पाटील यांच्याकडे त्यांच्या उत्पन्नापेक्षा 44 टक्के अधिक 82 लाख 89 हजारांची मालमत्ता मिळून आली.

सांगली : सांगली जिल्हा परिषदेमधून निवृत्त झालेल्या माजी कनिष्ठ लेखाधिकार्याकडे तब्बल 82 लाख 89 हजार रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी कनिष्ठ लेखाधिकारी अण्णासाहेब पाटील सांगली जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असताना त्यांनी भ्रष्ट मार्गाने मोठी संपत्ती मिळवली असल्याचा तक्रारी अर्ज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकाकडे आला होता.
सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याची तपासणी केली असता अण्णासाहेब पाटील यांच्याकडे त्यांच्या उत्पन्नापेक्षा 44 टक्के अधिक 82 लाख 89 हजारांची मालमत्ता मिळून आली. शासकीय सेवेत असताना भ्रष्ट मार्गाने बेशुबी संपत्ती मिळवल्याप्रकरणी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





