धारावीतील करोनाबाधितांनी पार केली शंभरी
Updated On:

मुंबई – मुंबईच्या धारावी परिसरात शुक्रवारी आणखी 15 करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे धारावीतील करोनाबाधितांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून धारावी परिसराकडे पाहिले जाते. मुंबईत आतापर्यंत 2 हजारहून अधिक करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे करोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची महाराष्ट्रातील संख्या देशात सर्वांधिक ठरली आहे.
अशात धारावीतील रूग्णसंख्येत दिवसागणिक होणारी वाढ चिंतेत भर घालणारी ठरत आहे. त्या परिसरात लोकसंख्येची घनता प्रचंड आहे. त्यामुळे धारावीत करोनाचा फैलाव रोखण्याचे मोठेच आव्हान संबंधित यंत्रणांपुढे आहे. त्या परिसरात करोनाने आतापर्यंत 10 रूग्णांचा बळी घेतला आहे.





