Satara: पराभवाची जबाबदारी माझीच, इतर कुणाची नाही
Satara जिल्हा बँक निवडणूक आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना मंत्री गोरे म्हणाले, भाजपने आजपर्यंत जी जबाबदारी दिली, ती मी इमाने इतबारे पार पाडली आहे. जिल्हा बँक निवडणूक आणि पदाधिकारी निवडीत काय घडले ते सर्व पटलावर आणायचे नसते. वेळ आली तर त्याही गोष्टी समोर आणल्या जातील. मी महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला. ज्यांनी हा धर्म पाळला नाही त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जिल्हा बँक निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा माझा सुरुवातीपासून आग्रह होता.

Satara: बँकेच्या निवडणुकीतील आणि पदाधिकारी निवडीतील पराभवाची जबाबदारी कुणी घ्यायची आवश्यकता नाही. ती माझी आहे. सत्ता असो किंवा नसो, मी कायम लढत आलो असून, यापुढेही लढत राहीन. मुख्यमंत्र्यांनी महायुती केली म्हणून आजचे चित्र दिसत आहे. बदल्याची आणि जखमा भरण्याची भाषा करणार्यांमध्ये दम होता, तर त्यांनी समोरासमोर लढाई करायची होती. मुख्यमंत्री बरोबर नसते, तर तुमचे काय झाले असते याचे आत्मपरीक्षण करा, असा सल्ला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कोणाचेही नाव न घेता दिला.
जिल्हा बँक निवडणूक आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना मंत्री गोरे म्हणाले, भाजपने आजपर्यंत जी जबाबदारी दिली, ती मी इमाने इतबारे पार पाडली आहे. जिल्हा बँक निवडणूक आणि पदाधिकारी निवडीत काय घडले ते सर्व पटलावर आणायचे नसते. वेळ आली तर त्याही गोष्टी समोर आणल्या जातील. मी महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला. ज्यांनी हा धर्म पाळला नाही त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जिल्हा बँक निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा माझा सुरुवातीपासून आग्रह होता.
मात्र, ही निवडणूक समन्वयाने लढावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे कुणी विनवण्या केल्या, जागा वाटपासंदर्भात आर्जव केले, त्यांनी आत्मपरीक्षण करावे. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतील कटुता, संघर्ष कमी व्हावा म्हणून, मी त्या सूचनांची अंमलबजावणी केली. महायुती करण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी कधीच बोललो नव्हतो. ज्यांनी महायुती करण्यासाठी विनवण्या केल्या, त्यांनीच बेईमानी केली. बँकेतील संचालकांच्या जागा भाजपच्या मतांवर निवडून आल्या आहेत. भाजपने निवडून दिलेल्या सदस्यांच्या ताकदीवर पदाधिकारी निवडी झाल्या आहेत. स्वतःच्या ताकदीवर पदाधिकारी निवडी करण्याची हिम्मत त्यांच्या कुणाच्यातही नव्हती. ज्यांना जखमा बर्या करायच्या होत्या, त्यांनी स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवायची होती.
भाजपचे उमेदवार अर्जुन काळे यांना पाडण्याचे प्रयत्न सर्व बाजूंनी झाले. महायुतीच्या धर्माला तिलांजली देण्यात आली. इतक्या अडचणीतून भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळेंना निवडून आणले. त्यावरुन आम्ही भाजप म्हणून स्वतंत्र लढलो असतो, तर सर्व आरक्षित जागा जिंकल्या असत्या, हे स्पष्ट आहे. काळेंच्या विजयावरुन जिल्ह्यात कुणाची किती ताकद आहे, हे दिसले आहे. वाई, खंडाळा, महाबळेश्वरमधील भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी ताकदीने लढला. फलटणमध्ये रणजितदादांनी अशक्य वाटणारी निवडणूक टप्प्यात आणली. कराड उत्तर, पाटण, कोरेगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एकाकी खिंड लढवली. आ. महेश शिंदेंनी ताकद लावली. तिथे आम्हाला चिठ्ठीमुळे अपयश आले. सगळ्या शक्तींविरोधात पाटणकरांनी पाटणमध्ये दिलेली लढत लक्षवेधी होती.
मी बँकेच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहिल्याचा अभिमान आहे. समोरुन लढून त्यांनी आमचा पराभव केला असता, तर तो मान्यही केला असता, पण महायुती म्हणून लढून आणि आमच्या मतांवर निवडून येऊन, विश्वासघाताने मिळवलेला विजय मिरवण्यायोग्य असू शकत नाही. आज त्यांना मिळालेला विजय, पदाधिकारी निवडी तुमच्या कष्टामुळे नाही, तर मुख्यमंत्र्यांनी महायुती केल्याने झाल्या आहेत. त्याचे श्रेय तुम्ही घ्यायचे कारण नाही. मुख्यमंत्र्यांनी महायुती केली नसती, तर चित्र वेगळे दिसले असते. पदाधिकारी निवडीत जे झाले त्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे. मी आयुष्यभर शिकत आलो असून, या निवडणुकीतूनही शिकलो आहे. खा. उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पक्षाचे आजी-माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीत केलेल्या प्रयत्नांचा मी आदर करतो. कोणताही पराभव अंतिम नसतो. सगळे अनुभव गाठीशी घेऊन ही लढाई पुन्हा ताकदीने लढू, असा विश्वास मंत्री गोरे यांनी व्यक्त केला.





