Satara: एनसीसी दिवस साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उत्साहात
Satara प्रमुख पाहुणे म्हणून सातार्यातील संदीप फायर सर्व्हिसेसचे संचालक संदीप खटमोडे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली धुमाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत आणि यशोदा संस्थेचे गीत सादर करण्यात आले. यावेळी एनसीसी कॅडेट्सनी शिस्तपालन आणि राष्ट्रसेवेची शपथ घेतली.

Satara: 79 वा राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) दिवस यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवारी (दि. 21) उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून सातार्यातील संदीप फायर सर्व्हिसेसचे संचालक संदीप खटमोडे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली धुमाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत आणि यशोदा संस्थेचे गीत सादर करण्यात आले. यावेळी एनसीसी कॅडेट्सनी शिस्तपालन आणि राष्ट्रसेवेची शपथ घेतली.
कॅडेट्सनी सादर केलेली साहसी आणि कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिके कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. यामध्ये दांडपट्टा, फ्लॅग एरिया, एनसीसी प्रदर्शन, सायलेंट ड्रिल, अॅम्बुश आणि अग्निशमन प्रात्यक्षिकांचा समावेश होता. सायलेंट ड्रिलमध्ये कॅडेट्सनी शारीरिक समन्वय, एकाग्रता, आत्मविश्वास, शिस्त आणि रायफल हाताळण्याच्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. दांडपट्टा प्रात्यक्षिकातून महाराष्ट्राच्या पारंपरिक युद्धकलेचे दर्शन घडवण्यात आले. अॅम्बुश आणि फ्लॅग एरिया उपक्रमांमधून निरीक्षणशक्ती, सतर्कता आणि सांघिक कार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
अग्निशमन प्रात्यक्षिकामध्ये आग शमवण्याच्या पद्धती, सुरक्षिततेचे उपाय, आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान राखण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एनसीसी गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शाळेच्या एनसीसी विभागामार्फत वर्षभर राबवण्यात आलेल्या उपक्रमांचे छायाचित्र आणि पोस्टर प्रदर्शन झाले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली पोस्टर्सही प्रदर्शित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एनसीसीच्या 22 महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी अधिकारी निलिका पाटील, प्रशिक्षक सुमित पाटील, शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





