Satara: जि. प.च्या आदर्श शाळांना निधी कमी पडू देणार नाही; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले
Satara सायळी येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आदर्श शाळा उपक्रमात सातारा तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील एक आदर्श शाळा निवडण्यात आली आहे.

Satara: जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सायळी येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आदर्श शाळा उपक्रमात सातारा तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील एक आदर्श शाळा निवडण्यात आली आहे. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांच्या प्रयत्नातून रोहोट केंद्रातून सायळी शाळेची निवड करण्यात आली होती.
या शाळेला संरक्षक भिंत, पेव्हर ब्लॉकसह सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याची ग्वाही ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली. शिक्षण आणि आरोग्याला जिल्हा परिषदेचे प्राधान्य असल्याचे राजू भोसले यांनी स्पष्ट केले. शाळेसाठी बाला पेंटिंगचा खर्च ग्रामस्थ मंडळ सायळी आणि मुंबई मंडळ सायळी यांच्यावतीने करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, पंचायत समितीचे सभापती महेश गाडे, उपसभापती सुषमा जाधव, सदस्य वसंतराव भंडारे, शोभा लोटेकर, शिवसह्याद्री समूहाचे संस्थापक ज्ञानेश्वर वांगडे, अनिल जायकर, सदाशिव कणसे, राजकुमार जाधव, आर. वाय. जाधव, संजय आहिरेकर, गटशिक्षणाधिकारी जयश्री शिंगाडे, केंद्रप्रमुख प्रमोद पवार, पंचायत समितीच्या माजी सदस्य विद्या देवरे, श्रीरंग देवरुखे, उद्योजक संतोष भोसले, प्रवीण माने उपस्थित होते.
प्रवीण माने यांनी शाळेला भेट दिलेला संगणक शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते मुख्याध्यापक बाळकृष्ण जगताप व माधवी ढाणे यांनी स्वीकारला. कार्यक्रमास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे, कार्याध्यक्ष शंकर देवरे, उपाध्यक्ष पोपट कोकरे, सचिव अरुण देवरे, ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष गणेश देवरे, श्यामराव सावंत, बाळासाहेब सावंत, सुनील देवरे, संजय जाधव, महेंद्र देवरे, योगेश देवरे, नीळकंठ देवरे, महेंद्र देवरे, अजित देवरे, शंकर देवरे, सरपंच पुष्पा कोकरे, उपसरपंच विकास देवरे, पोलीस पाटील मनोज देवरे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील देवरे, ग्रामपंचायत अधिकारी आकाश शिंदे, लक्ष्मण शिंदे यांनी सहकार्य केले. बाळकृष्ण जगताप यांनी प्रास्ताविक केले. सुरेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विनोद मोरे यांनी आभार मानले.





